Agriculture

Crop Loan Stamp Duty: पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या (Crop Loan Stamp Duty) पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे . या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक (Financial) भार कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे (Crop Loan Stamp Duty).

शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज (Crop Loan) घेण्यासाठी पूर्वी 500 रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. राज्याच्या महसूल आणि वन विभागाने हा निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना राजपत्रात करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर घेतलेल्या सर्व नवीन पीक कर्जांना ही मुद्रांक शुल्क माफी लागू आहे.

या निर्णयामुळे राज्यभरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना फायदा होईल, विशेषत: कृषी गरजांसाठी लहान-लहान कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच मुद्रांक शुल्क माफीमुळे (Crop Loan Stamp Duty) शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यास प्रोत्साहन देखील मिळेल अशी अपेक्षा आहे.

निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे (Crop Loan Stamp Duty)

  • 1.6 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क (Crop Loan Stamp Duty) माफ करण्याचा निर्णयाने शेतकऱ्यांना फायदा होणार असून त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होणार आहे.
  • 1 एप्रिल 2024 रोजी किंवा नंतर घेतलेल्या नवीन पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफी लागू.
  • या निर्णयामुळे कृषी उत्पादकतेला चालना मिळण्याची अपेक्षा.
Back to top button