Agriculture

खेकडापालनाचे प्रशिक्षण घेऊन करा महिन्याला लाखो रूपयांची कमाई, ‘इथे’ मिळेल शास्त्रशुध्द प्रशिक्षण.. लगेच संपर्क साधा | Crab Farming Training

मासे, कोळंबी, मुळे, खेकडे पालन (Crab Farming) हे कोकणातील स्थानिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. कोकणाला (Konkan) लाभलेल्या विस्तृत किनार पट्टीमुळे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडा संवर्धन यासारखे (Crab Farming) प्रकल्प ठिकठिकाणी कार्यान्वित आहेत.

यापैकी खेकडा पालन हा प्रामुख्याने मोठे अर्थाजन मिळवून देणारा घटक आहे. खेकड्याला स्थानिक पातळीवर तसेच प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी आहे. हीच बाब ध्यानात घेत, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Dr. BSKKV Dapoli) यांनी परसबागेत, घराच्या पडवीत, बंद असलेल्या गोठ्यात, एवढेच नाही तर अगदी आपल्या घरात (Crab Farming At Home) अवघ्या 150 x 100 च्या जागेत 200 खेकड्यांचे संवर्धन Crab Farming) करता येईल असे प्रशिक्षण सुरू केले आहे.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र (Marine Biological Research Station), रत्नागिरी (Ratnagiri) येथे ‘खेकडा पालन व्यवस्थापन’ (Crab Farming Training) या विषयाचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण दि. 18 ते 20 जुलै, 2024 या कालावधीत (तीन दिवसीय) होणार आहे.

या प्रशिक्षणामुळे खेकडा संवर्धनाद्वारे मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, तरुण बेरोजगार स्वत:ची प्रगती साधू शकतील. यामुळे खेकडा उत्पादन वाढीस चालना मिळेल. या प्रशिक्षणादरम्यान, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या खेकडा प्रकल्पातील संशोधकांमार्फत संबंधित विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल.  

  • तलावातील खेकडा संवर्धन, तलावामध्ये, खाड्यांमध्ये तरंगत्या फायबर खोक्यांमधील खेकडा संवर्धन, खाडीतील पेन कल्चर पद्धतीने खेकडा संवर्धन
  • खेकडा शेतीसाठी बांधकाम आणि आवश्यक यंत्र सामुग्री
  • खेकड्यांच्या बिजाची ओळख
  • खेकड्यांचे खाद्य व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन
  • खेकड्याना उद्भवणारे आजार आणि उपाय
  • खेकड्यांची सुरक्षित काढणी, बांधणी आणि विक्री व्यवस्थापन
  • प्रकल्प अहवाल याबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ यांचे कडून शास्त्रोक्त माहिती
  • यशस्वी संवर्धक यांचे अनुभव कथन, प्रकल्प/प्रक्षेत्र भेट

अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. सुरेश नाईक 8275454821
डॉ. हरिष धमगये 9511295814

Back to top button