‘स्टेनोग्राफर’ आणि ‘सामाजिक सुरक्षा सहाय्यक’ पदांसाठी भरती; कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 115 रिक्त जागा | CMPFO Bharti 2025

CMPFO Bharti 2025: कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत ‘स्टेनोग्राफर’ आणि ‘सामाजिक सुरक्षा सहाय्यक’ या पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 115 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2025 ही अंतिम तारीख लक्षात घ्यावी.

रिक्त पदांचा तपशील – CMPFO Bharti 2025

  • स्टेनोग्राफर: 11 जागा
  • सामाजिक सुरक्षा सहाय्यक: 104 जागा

शैक्षणिक पात्रता

  • स्टेनोग्राफर: 12वी उत्तीर्ण
  • सामाजिक सुरक्षा सहाय्यक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा तत्सम शिक्षण

वयोमर्यादा

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे.

अर्ज प्रक्रिया

  1. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. अर्ज सादर करण्यासाठी अधिकृत वेबसाइट: https://cmpfo.gov.in/
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2025

अधिक माहिती

PDF जाहिरातCMPFO Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराCMPFO Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://cmpfo.gov.in/