Sunday, September 24, 2023
HomeCareerचंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी | Chandrapur Forest Academy Recruitment 2023

चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी | Chandrapur Forest Academy Recruitment 2023

चंद्रपूर | फॉरेस्ट अकॅडमी ऑफ  अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, चंद्रपूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Chandrapur Forest Academy Recruitment 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत.

याठिकाणी, अभ्यासक्रम संचालक आणि विषय तज्ञ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांना वन्यजीव व्यवस्थापन, वनीकरण किंवा पर्यावरण विज्ञान यासारख्या क्षेत्रात किमान पदव्युत्तर पदवी (किंवा उच्च) असणे आवश्यक आहे.

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, चंद्रपूर
  • ई-मेल पत्ता – chandrama.cfa@gmail.com.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वीं उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.

या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल. अर्जांच्या छाननीनंतर, आवश्यक असल्यास पात्र उमेदवारांना मुलाखत आणि कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाऊ शकते. निवडीबाबत पात्र उमेदवारांना फोन/ई-मेलवर कळवले जाईल.

PDF जाहिरात Chandrapur Forest Academy Jobs 2023
अधिकृत वेबसाईटwww.chandrapurforestacademy.org

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular