मुंबई | रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत, सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये (CRIS Recruitment) कनिष्ठ अभियंता आणि एक्झिक्युटिव्हच्या 24 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज केले जात असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२२ आहे.
रिक्त जागा
कनिष्ठ विद्युत अभियंता – 04
कनिष्ठ स्थापत्य अभियंता – 01
कार्यकारी, कार्मिक/प्रशासन/HRD – 09
कार्यकारी, वित्त आणि लेखा – 08
कार्यकारी, खरेदी – 02
वय मर्यादा
सर्व पदांसाठी वयोमर्यादा 22 ते 28 वर्षे दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. SC/ST उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC ला 3 वर्षांची सूट मिळेल. 31 डिसेंबर 2022 पासून वयाची गणना केली जाईल.
पगार
स्तर-6 आणि डीए आणि इतर भत्ते.
अर्ज शुल्क
सामान्य आणि EWS – रु 1200
अपंग, महिला, SC, ST – 600 रु
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cris.org.in वर जाऊन अर्ज भरू शकतात.