नवी दिल्ली | देशातील लाखो तरुण सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांना सरकारी नोकरी (Central Government Job) मिळण्याची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 9.64 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत.
आता शासनाकडून (Central Government Job) रिक्त पदांची माहिती आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शासकीय पदे भरण्याची अपेक्षा आहे. सरकारने सर्व मंत्रालये/विभागांना रिक्त पदे भरण्यासाठी आधीच सूचना दिल्या आहेत. यावरील भरतीसाठी अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 9.64 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. या पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 40 लाखांहून अधिक मंजूर पदे आहेत, ज्यामध्ये 30 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तर आजही 9.64 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. 2023 च्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत ही माहिती समोर आली आहे.