Saturday, September 23, 2023
HomeCareer'आर्किऑलॉजिस्ट' म्हणून करिअर करायचं आहे? मग जाणून घ्या शिक्षण & करिअरच्या संधी...

‘आर्किऑलॉजिस्ट’ म्हणून करिअर करायचं आहे? मग जाणून घ्या शिक्षण & करिअरच्या संधी | Career Opportunities As Archaeologist

इतिहास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा या क्षेत्राविषयी आकर्षण असणार्‍यांसाठी या क्षेत्रात करिअरच्या (Career Opportunities As Archaeologist) अनेक संधी उपलब्ध आहेत. यापैकीच ‘पुरातत्वशास्त्रज्ञ’ हा यातील सर्वात उत्तम करिअरचा पर्याय आहे. पुरातत्वशास्त्र (Archeology) विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशा दोन्ही स्तरांवर अभ्यासक्रमांबरोबर या विषयामध्ये डिप्लोमाचे पर्यायही उपलब्ध आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून इतिहासातील गोष्टींचा, जुन्या संस्कृती, वस्तू, वास्तु यांचा अभ्यास करणे आणि त्याचा शोध घेणे याला पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. पुरातत्वशास्त्रज्ञाचे महत्वाचे काम म्हणजे इतिहासाचे जतन करणे तसेच इतिहासातील नवनवीन गोष्टींचा शोध लावणे हे आहे. यासोबतच ते ऐतिहासिक वस्तू आणि सभ्यता यांचा शोध घेतात. आधुनिक संग्रहालयांचे (Modern Museum) संरक्षणही पुरातत्वशास्त्रज्ञ करतात.

पुरातत्व शास्त्रातील अभ्यासक्रम

  • बारावीला इतिहास (History) विषय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह पदविका अभ्यासक्रमांच्या स्तरावरील अभ्यासक्रम निवडू शकतात.
  • विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार हे अभ्यासक्रम निवडू शकतात. देशातील तसेच परदेशातील विविध मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये (UCL यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडन) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

पुरातत्वशास्त्रातील नोकरीच्या संधी

पुरातत्वशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना प्रामुख्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, नवी दिल्ली येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात कामाची संधी मिळते. शिवाय, खासगी स्तरावरील नोकऱ्यांसाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

UPSC किंवा SPSC (राज्य लोकसेवा आयोग) च्या परीक्षा देऊन आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेमध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ म्हणून काम करता येते स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून असिस्टंट आर्किऑलॉजिस्ट पदासाठी भरती केली जाते.

पुरातत्वशास्त्रातील करिअरच्या इतर संधी

पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर NET किंवा Junior Research Fellowship (JRF) ची परीक्षा देऊन भारतभरात कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नोकरी मिळू शकते. एखाद्या विशिष्ट राज्यात प्राध्यापक म्हणून नोकरी हवी असल्यास त्या राज्याची SLET (State Level Eligibility Test) दयावी लागते. JRF ची परीक्षा दिल्यानंतर डॉक्टरेट करता विद्यार्थ्यांना पेड रिसर्च फेलोशिपही मिळते.

आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI), स्टेट डिपार्टमेंट ऑफ आर्किऑलॉजी ‘The planning Commission” अशा भारतीय, शासकीय संस्था तसेच ‘युनेस्को‘, ‘युनिसेफ‘ यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थात काम करण्याची संधी मिळते.

CRMS (कल्चरल रिसोर्स मॅनेजमेंट स्टडीज‘) कंपन्या, ICMR (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद) WHO (जागतिक आरोग्य संघटना‘) तसेच विविध स्वयंसेवी संघटना, पोलीस खाते या विभागातही पुरातत्व शास्त्रशाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

संग्रहालय क्षेत्रात आहेत करिअरच्या मोठ्या संधी

नॅशनल म्युझियम इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च अशा शासकीय किंवा खाजगी क्षेत्रातील संग्रहालयात, विविध सांस्कृतिक कलादालनात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

पुरातत्व विभागाच्या विविध समित्यांची संशोधनाला वाहिलेली विविध मासिके, नियतकालिके यातून लेखन, संपादन, संशोधन प्रकाशनाच्याही संधी मिळतात. आर्किटेक्चरचे शिक्षण घेतल्यानंतर आर्किऑलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना कन्झर्वेशन ऑर्किऑलॉजीमध्ये या करण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात. त्याचप्रमाणे आर्किऑलॉजिस्ट, आर्किओबॉटनिस्ट, अंडर वॉटर आर्किऑलॉजी इत्यादी प्रकारच्या काही विशेष संधी उपलब्ध असतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular