ट्रॅव्हलिंगची आवड आहे का? मग ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्येच करा करिअर | Career In Travel and Tourism

मुंबई | फिरण्याची आवड कोणाला नसते? मौज म्हणून, डेली रूटिनमध्ये ब्रेक म्हणून फिरायला जाणे, ट्रेक्स करणे हे तर झालंच पण याच क्षेत्रात (Career In Travel and Tourism) करिअर करता येत असेल, तर आपल्या आवडत्या जागी फिरण्यासाठी कोणीतरी पैसे देतय ही ऐकायलाच की भन्नाट कल्पना वाटते आहे. आता अशा अनेक संधी उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही याला करीअर बनवू शकतात.

संधी:-
पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यात मोठी गुंतवणूकही केली जात आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत.यासाठी तुम्ही ट्रॅव्हल एजन्सी, सरकारी पर्यटन विभाग, हॉटेल, टूर ऑपरेशन, इमिग्रेशन आणि कस्टम सर्व्हिसेस इत्यादींसाठी काम करू शकतात.

सर्टिफिकेट कोर्स:-
ट्रॅव्हल अँड टुरिझममधील डिग्री किंवा डिप्लोमा तर तुम्ही घेऊच शकतात पण त्याच बरोबरीने तुम्ही काही सर्टिफिकेट कोर्स देखील करू शकतात. शिवाय संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या विषयात पीएचडीही करू शकतात. ही पीएचडी तुम्ही कोणत्याही खाजगी किंवा सरकारी संस्थेतून करू शकता. त्यासाठी त्या संस्थेची प्रवेश परीक्षा पास करणे गरजेचं आहे.

  • युनिव्हर्सिटी:-
  • बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, नवी दिल्ली
  • क्राइस्ट युनिव्हर्सिटी, बँगलोर
  • एमिटी इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम, नोएडा
  • जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
  • लखनऊ युनिव्हर्सिटी, लखनऊ
  • पगार:-
    कँडीडेट ट्रॅव्हल एजंट, ट्रॅव्हल एक्झिक्युटिव्ह, ट्रॅव्हल ऑफिसर, टूरिस्ट गाईड, ट्रान्सपोर्ट ऑफिसर, ट्रॅव्हल रायटर, ग्राउंड स्टाफ, ट्रॅव्हल कौन्सिलर आणि ट्रान्सलेटर म्हणून काम करू शकतात. नोकरीच्या सुरुवातीस, तुम्हाला दरमहा 15-20 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. मात्र, काही वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला चांगला पगार सहज मिळू शकतो.