गेम डेव्हलपिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे? तर मग नक्की वाचा | Career In Game Developing

मुंबई | गेमिंग इंडस्ट्री भारतात मोठ्याप्रमाणात विकसित होत आहे. (Career In Game Developing) पब्जी आणि फ्री फायर सारख्या गेम्सने भारतीय तरूणांमध्ये गेमिंगविषयी क्रेझ वाढवली आहे. या क्षेत्रात ज्यांना करियर करायचं आहे त्यांनी सगळ्या कोर्सेसची माहिती करून घेणं आवश्यक आहे. गेम डिझायनिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतात. तुमच्या आवडिनुसार योग्य कोर्स निवडणं आवश्यक आहे.

शिक्षण:-
जर तुम्हाला फक्त गेम डेव्हलपर बनायचं असेल तर १२ वी नंतर कोणतेही लहान डेव्हलपिंग कोर्स करून तुम्ही डेव्हलपर बनू शकतात. पण जर तुम्हाला या क्षेत्रात चांगलं करियर करायचं असेल तर १२ वी नंतर तीन वर्षांचा डिग्री कोर्स करणं गरजेच ठरणार आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर एक वर्षाचा डिप्लोमा तुम्ही करू शकतात.

कोर्सेस:
मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन विथ गेम आर्ट अँड डिझाइन
मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन
ग्राफिक अ‍ॅनिमेशन अँड गेमिंग
गेम डेव्हलपिंग
डिप्लोमा इन गेमिंग प्रॉडक्शन
अ‍ॅनिमेशन अँड डिजिटल फिल्म मेकिंग
मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन
मीडिया अ‍ॅनिमेशन अँड डिझाइन
ग्राफिक अ‍ॅनिमेशन अँड गेमिंग
कंप्युटर सायंस अँड गेम डेव्हलपमेंट
अ‍ॅनिमेशन, गेम डिझाइन अँड डेव्हलपमेंट
डिप्लोमा इन अ‍ॅनिमेशन, गेमिंग, अँड स्पेशल इफेक्ट
अ‍ॅडव्हांस्ड डिप्लोमा इन गेम डिझाइन अँड डेव्हलपमेंट अ‍ॅप्लिकेशन
अ‍ॅडव्हांस्ड डिप्लोमा इन गेम आर्ट अँड थ्री डी गेम कंटेंट क्रिएशन

गेम डेव्हलपिंग कॉलेजेस:-
एरिना अ‍ॅनिमेशन दिल्ली
iPixio अ‍ॅनिमेशन कॉलेज बंगळुरू
एशियन अ‍ॅकेडमी फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन नॉयडा
भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन बंगळुरू
दिल्ली युनिव्हर्सिटी
अ‍ॅकेडमी ऑफ अ‍ॅनिमेशन अँड गेमिंग नॉयडा
इंडिया गेम्स मुंबई
जंप गेम्स मुंबई
इंस्टिस्ट्यूट फॉर इंटेरियर फॅशन अँड अ‍ॅनिमेशन बंगळुरू