मुंबई | अनेकांना चित्र काढण्याची खूप आवड असते. (Career In Drawing) विविध प्रकारची चित्रे त्यांना सहज काढता येतात. त्यामुळेच जर तुम्हाला चित्र काढण्यात रस असेल तर तुम्ही त्यात करिअर करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका करिअर बद्दल सांगणार आहोत.
आर्ट कोर्स
कला क्षेत्रामध्ये डिग्री घ्यायची असेल, तर बारावी हा बेस मानला जातो. बारावी पास झाल्याशिवाय आर्ट कोर्ससाठी तिथे अॅडमिशन मिळत नाही आणि शालेय जीवनातून कला क्षेत्रात जाण्यासाठी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे. इंटरमिजिएट परीक्षा ही यासाठी आवश्यक आहे. कारण त्यामध्ये कला क्षेत्राचा प्राथमिक बेस घेतला जातो. नेचर, स्टील लाईफ, डिझाईन इत्यादी विषय आहेत. या विषयांची ओळख होते. त्यामुळे मुलांना आपले विषय निवडणे सोपे जाते. म्हणून इंटरमिजिएट परीक्षा पास असणे आवश्यक आहे. दहावीनंतरही बरेच कोर्स आहेत. पण ते डिप्लोमा कोर्स आहेत आणि बारावीनंतर डिग्री कोर्स आहेत. भावी आयुष्यात डिग्री कोर्सचा बराच उपयोग होतो.
बारावी झाल्यानंतर तसे बरेच कोर्सेस आहेत. यात बॅचलर ऑफ फाइन आर्ट तसेच त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. यामध्ये बीएफए पेंटिंग आणि शिल्पकला, अप्लाइड आर्ट असे विषय आपण निवडू शकतो. अप्लाईड आर्ट म्हणजे जाहिरातीसंबंधी कोर्स आहे. आपल्याला वर्तमानपत्र किंवा मासिक यांच्यासाठी ज्या जाहिराती लागतात. त्यात स्टेशनरीचे डिझाइन्स, कंपनीचे लोगो, सिम्बॉल यां पासून सुरुवात होते.
पात्रता आणि कालावधी –
10वी आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्ही ड्रॉईंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकता (12वी नंतरचे करिअर पर्याय). हा अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून करता येतो. ऑफलाइन कोर्ससाठी 3 महिने ते एक वर्षाचा कालावधी लागतो. त्याच वेळी, ऑनलाइन अभ्यासक्रम काही तासांपासून 1 वर्षात करता येतो.
इथे करियर करा –
शिकवणे
चित्रकार
हास्य कलाकार
कला दिग्दर्शक
म्युरलिस्ट
भेट देणारा कलाकार
व्यावसायिक कलाकार
चित्रकला अभियंता