Tuesday, September 26, 2023
HomeCareerArtificial Intelligence क्षेत्रात करिअर कसे करावे..? जाणून घ्या पात्रता अन् मिळणारा पगार!

Artificial Intelligence क्षेत्रात करिअर कसे करावे..? जाणून घ्या पात्रता अन् मिळणारा पगार!

सध्या सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला सुरू आहे. Artificial Intelligence हे आगामी काळातील महत्वाचे करिअर बनणार आहे. कारण सध्या चॅट जीपीटी किंवा अन्य AI अ‍ॅप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर्स विविध उपकरणांमध्ये वापरली जात आहेत. त्यामुळे हे क्षेत्र अत्यंत वेगाने वाढत असून या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण होत आहेत.

जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनाही एआय क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचे वाटते. सध्या AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा सर्वत्र वाढता वापर यामुळे ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स्पर्ट्सना मागणी वाढत आहे. त्यामुळे एआय या क्षेत्रात करिअरच्या वेगवेगळ्या अनेक संधी निर्माण होत आहेत. या संधी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेऊया..

एआय क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर सायन्स अर्थात विज्ञान शाखेतून बारावी होणे आणि त्यानंतर कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित विविध क्षेत्रात स्पेशलायझेशन करून त्यात एक्स्पर्ट होता येते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राशी निगडित प्रमुख कोर्सेस

  • Master’s Degree in Machine Learning and AI
  • Foundations of Artificial Intelligence and Machine Learning
  • Post Graduate Program in Artificial Intelligence and Machine Learning
  • A full stack machine learning and artificial intelligence program
  • Post Graduate Certificate Program in Artificial Intelligence and Deep Learning

AI संबंधीत हे कोर्स कुठे करता येतील?

AI क्षेत्राशी निगडित कोर्सेस आयआयटी कॉलेजेसमध्ये करता येतात. खरगपूर, दिल्ली, मुंबई, कानपूर, मद्रास, गुवाहाटी, रूरकी या शहरांतल्या आयआयटी कॉलेजेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कोर्सेस आहेत. त्याशिवाय बेंगळुर मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स & सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबॉटिक्स, नवी दिल्लीतील नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिट्स-पिलानी, म्हैसूरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग, अलाहाबाद मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसेच हैदराबाद विद्यापीठ या संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित कोर्सेस शिकवले जातात.

या क्षेत्रात किती पगार मिळू शकतो?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या क्षेत्रात शिक्षण घेतलेल्याना मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातली पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला सुरुवातीलाच मासिक 50-60 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. त्यानंतर अनुभव आणि कौशल्य यांच्या आधारे वेतन वाढत जाते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular