कृषी क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे का? तर मग नक्की वाचा | Career In Agri Sector

मुंबई | देशातील जवळजवळ सत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. (Career In Agri Sector) नव्या पद्धतीने शेतीचा विकास आणि संशोधन होण्यासाठी देशातील अनेक कृषी विद्यापीठे कार्यरत असतात. कृषी विज्ञान यासारख्या नव्या संकल्पना उदयास येत असताना त्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी आता उपलब्ध होत आहेत.

पात्रता:-
शेती हा व्यवसाय म्हणून उत्तम पद्धतीने केल्यास त्यामध्ये करिअर करता येते. क्षेत्रात पदवी संपादन करण्यासाठी शास्त्र शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी शिक्षण हे दोन स्तरावर दिले जाते.कृषी निम्नशिक्षण पदविका ही कृषी विद्यालयातून दिले जाते. राज्यातील कृषी विषयातील उपलब्ध अभ्यासक्रम कृषी, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, वनिकी, पशुसंवर्धन हे होत.

  • करिअरच्या संधी:-
  • कृषी पदवीधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत पदवी-पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये व्याख्याता, कृषी तंत्रनिकेतन, कृषी तंत्र विद्यालयांमध्ये शिक्षक हे पद मिळू शकते.
  • शेती विषयात माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये, कृषीविषयक किमान कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक होता येईल.
  • कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ या पदावर तसेच कृषी विस्तार कार्य करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रांवर शास्त्रज्ञ म्हणून काम करू शकतात.
  • राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये विविध पदांवर काम करण्याची संधीही उपलब्ध आहे. याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्येही विविध पदांवर कृषी अधिकारी, ग्रामसेवक या पदांवर काम करण्याच्या संधी या पदवीधारकांना उपलब्ध आहेत.
  • कृषी पदवीधरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्यासुद्धा संधी करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बँका, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त, कॉर्पोरेशन, बहुराष्ट्रीय कंपन्या व कृषी आयात-निर्यातीमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.

प्रशासकीय सेवा परीक्षा:-
तसेच महत्त्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रातील पदवीधर तरुण-तरुणींना प्रशासकीय सेवा परीक्षा देता येतात. यामध्ये केंद्र सरकारची भारतीय वनसेवा परीक्षा, तसेच महाराष्ट्र शासनाची कृषी सेवा तसेच वनसेवा परीक्षा यांचा समावेश होतो. जर युवक-युवती या परीक्षा पास आऊट झालेत तर शासनाच्या उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळते, यासाठी कृषी पदवीधरांनी जास्तीत जास्त प्रयत्न करायला काही हरकत नाही.

प्रशिक्षण संस्था:-
1) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अहमदनगर
2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी नगर, अकोला
3) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, बासमत रोड, कृषीनगर, परभणी
4) डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी