पुणे | पुणे येथील भारत विकास ग्रुप अर्थात BVG Ltd. अंतर्गत 400 रिक्त पदांसाठी भरती (BVG Jobs 2023) केली जाणार आहे. या भरती संदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून 12 आणि विविध ट्रेड मधील ITI धारकांना याठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे.
भारत विकास ग्रुपची स्थापना 1997 साली पुणे येथे झाली असून कपंनी देशविदेशात आपली सेवा देत आहे. 2016 मध्ये भारत विकास ग्रुपमधील कर्मचाऱ्यांची संख्या 65 हजाराहून अधिक होती. भारत विकास ग्रुप देशातील 20 राज्यांमध्ये 800 हून अधिक ठिकाणी सेवा पुरवत आहे.
सदर पदभरतीसाठी उमेदवारांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांसहित जेजुरी पालखी तळ, ता. पुरंदर , जि. पुणे येथे 31 जुलै 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
BVG Jobs 2023 – TOOL AND DIE MAKER / FITTER / WELDER / HELPER
नोंदणी करा – rojgar.mahaswayam.in