Sunday, September 24, 2023
HomeCareerशेवटची संधी | 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3444...

शेवटची संधी | 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी भारतीय पशुपालन निगम लि. मध्ये 3444 रिक्त जागांसाठी मेगाभरती | BPNL Bharti 2023

मुंबई | सरकारी नोकरीच्या विविध संधी सध्या उपलब्ध असल्याचे दिसत आहे. राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये सूरू असलेल्या भरतीतून अनेकांना रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. अशीच संधी सध्या 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL Bharti 2023) या सरकारी विभागाने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जुलै 2023 आहे. 

या पदभरती अंतर्गत 3444 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये सर्वेक्षक पदाच्या 2870 जागा तर सर्वेक्षक प्रभारी पदाच्या 574 जागा आहेत. (BPNL Bharti 2023)

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : (BPNL Bharti 2023)
सर्वेक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून कोणत्याही विषयात 12वी उत्तीर्ण

सर्वेक्षक प्रभारी शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून कोणत्याही विषयात 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.
परीक्षा फी :
सर्वेक्षक- रु.826 आहे.
सर्वेक्षक प्रभारी -944

या पदांसाठी किती पगार मिळेल?
वरील दोन्ही पदांसाठी वेतनही स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहे. प्रभारी सर्वेक्षक पदासाठी दरमहा 24 हजार रुपये तर सर्वेक्षक पदासाठी दरमहा 20 हजार रुपये वेतन आहे.

या पदांसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.bharatiyapashupalan.com
भरतीची जाहिरात : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लीक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular