मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खात्या (BMC Recruitment) अंतर्गत “परिचारिका” पदाच्या एकूण 652 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 08 मार्च 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
या भरतीत परिचारिका पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठीखालील लिंक वरील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अर्जाचा नमुनादेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहिरातीतील विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह ‘वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय, वॉर्ड नं. ७, मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी (पश्चिम) मुंबई ४०००११ या पत्त्यावर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे.मुंबई महानगर पालिका आणि इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून ही निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांना ८ ते २१ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीमध्ये लेखी अर्ज करता येणार आहे.
- पदाचे नाव – परिचारिका
- पदसंख्या – 652 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 मार्च 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023
- अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/lvwI1
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
परिचारिका | 1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (10+2) उत्तीर्ण झालेला असावा. 2) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी ( General Nursing & Midwifery) अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण केलेला असावा. (3 किंवा 32 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण उत्तीर्ण झालेला असावा.) 3) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा व नोंदणीचे नूतनीकरण अद्ययावत केलेले असावे. 4) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
परिचारिका | Rs. 35,400 – 1,12,400/- |
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 मार्च 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.