Saturday, September 23, 2023
HomeCareerकोणतीही परिक्षा नाही, मुंबई महानगरपालिकेत थेट मुलाखतीव्दारे नोकरीची सुवर्णसंधी | BMC Recruitment...

कोणतीही परिक्षा नाही, मुंबई महानगरपालिकेत थेट मुलाखतीव्दारे नोकरीची सुवर्णसंधी | BMC Recruitment 2023

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (BMC Recruitment 2023) संधी उपलब्ध झाली आहे. पालिकेच्या आस्थापनेत अनेक संवर्गातील जागा रिक्त आहेत. नुकतीच पालिकेने भरतीची अधिसूचना जाहीर केली असून या अंतर्गत महापालिकने कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाच्या रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून 22 सप्टेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याचे सर्व तपशील खाली दिलेले आहेत.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, कला किंवा त्या समकक्ष शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवाराला परेक्षेच्या प्रथम प्रयत्नातच किमान 45% गुण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार महाराष्ट्र शासनाची इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा 30 शब्द प्रतिमिनिट या वेगात उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शेठ व्ही. सी. गांधी आणि एम.ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी, घाटकोपर (पूर्व).
निवड झालेल्या उमेदवारांना पालिकेच्या घाटकोपर येथील रूग्णालयात काम करावे लागेल. तसेच उमेदवारांना 20 हजार रूपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. विहित तारखेनंतर म्हणजेच 22 सप्टेंबर 2023 नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जा सोबतची कागदपत्रे साक्षांकीत केलेली असावी.

PDF जाहिरात – BMC Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट : portal.mcgm.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular