काळी मिरी आहे अतिशय गुणकारी, जाणून घ्या फायदे; Black Pepper Benefits

मसाल्यामध्ये काळ्या मिरीला विशेष महत्व आहे. मसाल्यांचा राजा म्हणूनही काळी मिरी ओळखली जाते. मिरीत असणार्‍या औषधी गुणधर्मांमुळे मिरीला Black Pepper Benefits आयुर्वेदातही विशेष महत्व आहे. मिरी चवीला तिखट असते. काळ्या मिरीचे वैज्ञानिक नाव पायपर निग्राम (Piper Nigram) असे असून याचा वापर औषध आणि मसाला असा दोन्कहींसाठी करता येतो. 

काय आहे काळ्या मिरीचे आहारातील महत्व जाणून घेऊया…

मिरी आणि गुळाचे चाटण खाल्यास भूक वाढते यामुळे जेवणात काळ्या मिरीचा वापर चांगला ठरतो कारण काळी मिरी तुमची भूक वाढविण्याचे काम करते.

गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा यावर रामबाण उपाय ठरतो. एक कप पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस,Black Pepper Benefits अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ चांगले मिश्रण करून दररोज घेतल्याने गॅसची समस्या दूर होते.

अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि एक चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.

अपचनाचा त्रास होत असेल तर  एक चमचा लिंबू रस, थोडेसे काळे मीठ आणि मिरपूड एकत्र करा आणि चोखा.

फुफ्फुसात आणि श्वसननलिकांमध्ये संसर्ग झाल्यास काळीमिरी आणि पुदीना चहामध्ये टाकून पिऊ शकता.

जर घसा बसला असेल तर तूप, साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा. Black Pepper Benefits आणि ते दिवसातून दोन वेळा घ्या. घश्याला आराम मिळेल.

काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घेऊन त्यामध्ये तूप घालून त्याच्या लहान गोळ्या बनवा. दिवसातून तीन-चार वेळा या गोळ्या चोखा. खोकला निघून जातो व घसा एकदम साफ होतो.

(उष्णतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी काळ्या मिरीचे प्रमाणात सेवन करावे.)