Saturday, September 23, 2023
HomeNewsMPSC परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची काळी यादी जाहीर, यापुढे परीक्षा..

MPSC परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची काळी यादी जाहीर, यापुढे परीक्षा..

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची काळी यादी आयोगाने जाहीर केली आहे. एकूण 83 उमेदवारांच्या या यादीतील विद्यार्थ्यांना आता पुढील परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही.

2011 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेपासूनची ही यादी असून जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेपर्यंतची ही यादी आहे. यामध्ये एकूण 83 पैकी 79 उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आले आहे. तर चौघांना पाच वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. सदर उमेदवारांना आयोगाकडून घेण्यात येणारी एकही परीक्षा या कालावधीत देता येणार नाही. पाच वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात आलेल्या चार उमेदवारांना त्यांचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा परीक्षा देता येईल.

परीक्षा कालावधीत गैरप्रकार केल्या प्रकरणी तसेच विविध कारणांसाठी उमेदवारांवर बंदी घातली जात असते. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या काळ्या यादीत सर्वाधिक उमेदवार हे 2016 मध्ये घेण्यात आलेल्या कर सहाय्यक परीक्षेतील आहेत.विविध परीक्षेतील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular