News

लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी, सदाभाऊ खोतांसह भाजपकडून ५ जणांना लॉटरी | BJP Candidates Vidhan Parishad

मुंबई | महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण पाच जणांना भाजपानं उमेदवारी (BJP Candidates Vidhan Parishad) जाहीर केली आहे. 

पंकजा मुंडे यांच्यासह परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. सध्याच्या घडीला महायुतीचं संख्याबळ पाहता भाजपाचे ५ उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यानुसार भाजपानं पाच जणांना आपल्याकडून संधी दिली आहे.

\"\"

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तसेच त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २ जुलै आहे. तत्पूर्वी आज भाजपाकडून आपल्या विधान परिषद उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे.

पंकजा मुंडेसोबतच विदर्भातून परिणय फुके, योगेश टिळेकर आणि महायुतीमधील मित्रपक्षांमधून सदाभाऊ खोत यांना भाजपानं संधी दिली आहे.

Back to top button