मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भूमी अभिलेख भरती निकालाची प्रतीक्षा होती. अखेर आज २१ जानेवारी २०२३ रोजी भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांनी त्यांच्या विभागानुसार निकाल खाली दिलेल्या पीडीफ द्वारे बघावा. जे विद्यार्थी भूमी अभिलेख लेखी परीक्षेमध्ये पास झाले आहेत, त्यांना कागदपत्र पडताळणी साठी बोलावले जाईल. त्याकरिता अधिकृत कागदपत्र पडताळणी यादी येथे बघा व कट ऑफ बघण्यासाठी येथे क्लिक करा.
भूमी अभिलेख विभागाकडून एक हजार 993 पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षा प्रक्रियेवर दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भरती परिक्षेचा निकाल आज दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजलेनंतर किंवा शनिवार 21 जानेवारी लागेल. महसूल विभागाने मागील आठवड्यात याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले होते.
भूमी अभिलेख विभागाकडून एक हजार ११३ भूकरमापक (सर्वेअर) पदासाठी गेल्यावर्षी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल १५ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र, या परीक्षेवर आक्षेप घेणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. परंतु, न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘‘परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब लागला. मात्र, आता निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल.’
उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
गेल्या वर्षभरापासून विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली भूमी अभिलेख विभागाकडून १११३ भूकरमापक (सर्व्हेअर) पदासाठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली. पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण-मुंबई विभागात २४४, नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ जागा रिक्त आहेत. अशा एकूण १११३ जागा भरण्यात येणार आहेत.
Bhumi Abhilekh Result 2022 | |
Category | Exam Result |
Department | Maharashtra Land Records (Maha Bhumi) |
Recruitment | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2022 |
Post | Surveyor Cum Clerk |
Article Name | Bhumi Abhilekh Result 2022 |
Bhumi Abhilekh Result 2022 Date | January 2023 |
Official Website of Bhumi Abhilekh | www.mahabhumi.gov.in |
भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल 26 डिसेंबरला जाहीर होणार होता. परंत्तू, प्राप्त नवीन अपडेट नुसार निकाल 15 जानेवारी 2023 प्रकाशित होईल. नवीन प्राप्त नुसार निकाल आता 15 जानेवारी 2023 निकाल प्रकाशित करण्यात येईल असे समजते.
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे विभागीय अधिकारी जिल्हा वाटप करतील. या जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर या उमेदवारांना सहायक भूकरमापक म्हणून कामाचा अनुभव दिला जाणार आहे. या दरम्यान संबंधित उमेदवारांचे काम, त्यांना या कामात किती रस आहे, हे समजणार आहे. त्यानंतर औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जून महिन्यात ९० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
काही उमेदवार निकालानंतर एक महिन्यात रुजू न झाल्यास किंवा रुजू झालेले उमेदवार काही कारणांनी सोडून गेल्यास जागा रिक्त राहू नयेत म्हणून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.