भंडारा |भंडारा जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे (Bhandara Job Fair 2023) आयोजन करण्यात आले असून 8 सप्टेंबर 2023 रोजी ऑफलाईन पध्दतीने हा मेळावा पार पडणार आहे.
एकूण 1000 रिक्त जागांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून12 वी, ITI, Diploma तसेच पदवीधारक उमेदवार या मेळाव्यास हजर राहू शकतात. हा मेळावा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/ जागेवरच निवड संधी मोहीम – या माध्यमातून आयोजित केलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून मेळाव्याला हजर राहावे. (Bhandara Rojgar Melava 2023)
या मेळाव्यात BSA CORPORATION LIMITED, BVG INDIA LTD आणि PIPAL TREE VENTURES PVT LTD यांच्याव्दारे भरती केली जाणार आहे.
मेळाव्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर ता.तुमसर जिल्हा भंडारा.
PDF जाहिरात – Bhandara Rojgar Melava 2023
नोंदणी वेबसाईट – https://rojgar.mahaswayam.gov.in/