धक्कादायक! मराठ्यांना खेटायला मोठ्या संख्येने सीआयडी ऑफिस पुणे येथे उपस्थित रहा; Walmik Karad नी वंजारी युवकांना दिला होता संदेश?
Walmik Karad । संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी आज पुण्यात पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. तब्बल 22 दिवसांपासून फरार असलेल्या कराड यांच्या शरणागतीसह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
शरणागतीपूर्वी युवकांना दिले संदेश
वाल्मिक कराड यांनी शरणागतीपूर्वी वंजारी समाजातील युवकांना पुण्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वंजारी युवकांना एकत्र आणण्यासाठी गाड्या पुरवण्यात आल्या आणि परळीतून आलेल्यांची राहण्याची सोय केली गेली. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
काल रात्री वाल्मिक कराडने वंजारी युवकांना सांगितले होते की उद्या पुण्यात सेरेंडर करायचं आहे. पुण्यातील मराठा समाज समोर आला तर त्यांच्याशी खेटायला मोठ्या संख्येने सीआयडी ऑफिस पुणे आसपास उपस्थित रहा असा संदेश परळी बीड व पुण्याच्या आसपास असणाऱ्या वंजारी युवकांना गेले. तसेच त्यांना आणण्यासाठी गाड्या पुरवल्या आणि काल परळीहून आलेल्यांची रात्री सोय केली, असे ट्विट सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले की, सीआयडी आणि पोलिसांना हे सगळं माहीत नसेल का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भैया पाटील यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. “आरोपींना कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. गुंडगिरी संपवण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले आहे,” असे त्यांनी जाहीर केले.
ठाकरे गट आणि काँग्रेसचा सवाल
ठाकरे गटाने गृहखात्यावर टीका करत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का, अशी शंका व्यक्त केली आहे. तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाला “शरणागती की तपासाची नौटंकी” असा सवाल केला आहे.
आमदार रोहित पवारांची विनंती
आमदार रोहित पवार यांनी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून कुठलेही कच्चे दुवे राहू नयेत, याची काळजी घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यावर जोर दिला आहे.
राजकीय वातावरण ढवळून निघाले
या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. वाल्मिक कराड यांच्या शरणागतीनंतर तपासाला वेग आला असला तरी गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.