बदाम आणि दूध एकत्र घेण्याचे ‘हे’ आहेत फायदे जाणून घ्या सविस्तर; Benefits of Almond and Milk

कोरोना सारख्या महामारी नंतर लोक आरोग्याबद्दल बरेच जागरूक होताना दिसत आहेत. आहार आणि आरोग्य यांचा थेट संबंध असल्याने आपण आहारात काय घेतो यावर आपले आरोग्य बऱ्यापैकी अवलंबून असते. दुधामधून आरोग्याला पूरक प्रथिने आणि इतर घटक आपल्याला मिळतात. दूध आणि बदाम एकत्र घेतल्याने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. चला तर मग पाहूया बदाम आणि दूध एकत्र घेण्याचे विविध फायदे…
(Benefits of Almond and Milk)

संधीवात व हाडांच्या रोगांपासून संरक्षण (Relief from Joint Pain)

दूध आणि बदाम या दोन्हींमध्ये व्हिटॅमिन – डी (vitamin- d) चे प्रमाण भरपूर असते ज्याची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता असते. व्हिटॅमिन -डी मुळे हाडांचे संरक्षण होण्यास मदत होते म्हणजेच काय तर हाडे मजबूत बनतात. यामुळे दुध आणि बदाम एकत्र घेण्याचा दुहेरी फायदा आपल्या शरीराला होतो.

वजनावर नियंत्रण ठेवते (Weight Management)
दुधामध्ये प्रोटीन्स आणि बदामामध्ये फायबर Fibre तसेच हेल्दी फॅट्स भरपूर असतात यामुळे भूक कमी लागते ज्यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढविते (Immunity Booster)
बदामातील ‘ व्हिटॅमिन – डी आणि ई ‘ हे घटक आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. दूध शरीरातील ताकद वाढविते. यामुळेच पैलवान तसेच कष्टाची कामे करणाऱ्या लोकांना सकाळी दूध प्यायला दिले जाते.

स्मरणशक्ती वाढविते (Help to Increase Memory Power)
दररोज संध्याकाळी झोपताना किंवा सकाळी भिजविलेले बदाम आणि गाईचे दूध एकत्र घेतल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच यामुळे दिवसभर शरीरातील एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.

हिमोग्लोबीन वाढण्यास मदत (Help to Increase Hemoglobin )
रक्तातील हिमोग्लोबीन हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो नेहमीच प्रत्येकामध्ये आवश्यकतेपेक्षा कमी असतो. दूध आणि बदाम या दोन्हींमध्ये व्हिटॅमिन्स, तांबे (copper), लोह (iron) हे घटक असतात जे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे बदाम आणि दूध याचे नियमित सेवन करणे फायद्याचे ठरते.

हृदविकाराचा धोका कमी (Reduce Heart Problems)
बदाम व दूध घेतल्याने वजन आटोक्यात राहते त्यामुळे रक्तदाब सुरळीत होतो व कोलेस्टेरॉल चे प्रमाण नियंत्रित राहते. यामुळे साहजिकच हृदविकाराचा धोका कमी होतो.

अशाप्रकारे बदाम व दूध एकत्र घेण्याचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते, शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. दूध हे लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वांना दिले जाते कारण दूध शरीरातील शक्ती वाढविण्यास मदत करते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने दुधाचे व बदामाचे सेवन करणे हितकारक ठरते.