Saturday, September 23, 2023
HomeCareerAny Graduate - BECIL अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती | BECIL Recruitment...

Any Graduate – BECIL अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती | BECIL Recruitment 2023

मुंबई | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची (BECIL Recruitment 2023) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. एकूण 10 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार असून 2 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून वरिष्ठ मॉनिटर, मॉनिटर (7
ऑगस्ट 2023) वेब डेव्हलपर, व्यवस्थापक-कार्यकारी वसतिगृह आणि आदरातिथ्य सेवा, एचआर एक्झिक्युटिव्ह, आयटी एक्झिक्युटिव्ह, मेंटेनन्स पर्यवेक्षक (2 ऑगस्ट 2023)  
या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

या  भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी becilregistration.com या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात. कृपया ऑनलाइन अर्जामध्ये तुमची संपूर्ण शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव तपशील नमूद करा.

उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ऑनलाइन सबमिशन केल्यानंतर त्यांच्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular