कोल्हापुराच्या सुपुत्रांनी तयार केलेल्या ‘बारदोवी’ फिल्मचे हिंदी सिनेसृष्टीत कौतुक | Bardovi
कोल्हापूर | कान्स फिल्म फेस्टिवल गाजविणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बारदोवी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Bardovi चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करण शिवाजीराव चव्हाण यांनी केलं असून चित्रपट 2 ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमधील मानवी नातेसबंध, तंत्रविद्या, रहस्य तसेच अतर्क्य घटनांची मालिका प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत आहे. यामुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपटाचा ट्रेलर मती गुंग करणारा असून चित्रपटाचं चित्रीकरण आणि व्हीएफएक्स उच्च दर्जाचं आहे. कसदार कथानकाला दमदार तांत्रिक बाजू आणि पार्श्वसंगीताची साथ लाभल्याचं ट्रेलरवरून दिसून येत आहे. कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला बारदोवी सर्वच बाबतीत हिंदी चित्रपटांच्या तोडीस तोड असल्याचे दिसून येत आहे. यामुळं सिनेक्षेत्रातून बारदोवीच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला आणि अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांच्या दमदार अभिनयाने नटलेला बारदोवी हा पूर्ण लांबीचा हिंदी थरारपट आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलीकडेच त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम त्यांच्या कारकिर्दीतील नव्या जबाबदारीसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत बारदोवी चित्रपटाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप काळे, एल्विन राजा, हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, छाया कदम चित्रपटाच्या सहनिर्मात्या तर संतोष तांबे, रविराज वायकर, अभिजित पाटील, नितीन पांचाळ हे असोसिएट प्रोड्यूसर आहेत.
कोल्हापूरात तयार झालेला पूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट; चित्रपटाची निर्मिती करणारी बहुतांशी टीम कोल्हापूरातीलच
चित्रपटाची कोअर टीम:
लेखक आणि दिग्दर्शक करण चव्हाण, निर्माता अमित जाधव, अर्जुन जाधव, कार्यकारी निर्माता विकास डिगे, कॅमेरा विक्रम पाटील, प्रोडक्शन डिझाइन अरविंद शामराव मंगल, संकलन चंद्रशेखर गुरव, संगीत अनिकेत मंगरुळकर, साउंड डिझाइन आणि मिक्सिंग पियुष शहा, ध्वनी रेकॉर्डिस्ट आदित्य चव्हाण, थिम साँग ऐश्वर्य मालगावे, कॉश्चुम डिझायनर वृषाली कामते.
चित्रपटातील प्रमुख कलाकार:
चित्तरंजन गिरी, छाया कदम, विराट मडके
बालकलाकर:
नीलशेठ, श्रिया अथणीकर, स्वराली डिगे, समर्थ नाईक
सहाय्यक कलाकार:
प्रभाकर वर्तक, राजेंद्र भांभुळकर, रुकय्या शिलेदार, निलेश आवटी, गायत्री यमकर, अनंत खासबरदार, गुरुनाथ घारगे, अनुप साठे, सिद्धी मगदूम, सरदार पाटील, अस्मा मुल्ला, आनंद कदम, अतुल सुरुलकर, भाग्यश्री नाईकवडे, आदित्य आवळे.
निर्मिती सहाय्य:
दिगंबर पाटील, हरीश कुलकर्णी, नवनाथ फेंगसे, विपुल हळदणकर, राजेंद्र हंकारे, अभिषेक साळवे, भालचंद्र कापसे, कुणाल पानसे, प्रतिक सुतार, विजय पावसकर, रोहित वरेकर, प्रफुल्ल कुंभार, नितीन साठे, अनुप साठे, दर्शन मांजरे, आयुषी पांचाळ, दीक्षा देसाई, आसावरी नागवेकर, राहुल सुतार, मिलिंद माने, अक्षय पोळके, अनुया नागवेकर, प्रथमेश सावेकर, झैद मुलाणी, अनुराग पंत, रेणुका जोशी, महेश गवळी, शुभम पोवार, मिलिंद नायडू, डॉ.चंदा सोनकर, विनायक कुंभ्रळकर, आम्रपाली चव्हाण, दिगंबर पाटील, धनंजय जोशी, अमन सिन्हा, ऋषिकेश जोशी, युवराज चव्हाण, शरद चव्हाण, आशुतोष घारगे, कार्तिक घारगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.