Tuesday, September 26, 2023
HomeCareerबँकेत देखील होते कृषि अधिकाऱ्यांची भरती; जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती |...

बँकेत देखील होते कृषि अधिकाऱ्यांची भरती; जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती | Bank Agriculture Officer Job

मुंबई | बँकेतील नोकरी म्हणटले की, क्लर्क, मॅनेजर किंवा PO या पदांसाठी भरती होत असल्याचे आपल्याला माहिती आहे. देशातील लाखो उमेदवार या पदांसाठी अर्ज करत असतात आणि बँकेच्या परीक्षा देत असतात. पण बँकेत कृषी अधिकाऱ्यांचीही जागा (Bank Agriculture Officer Job) भरण्यात येते. बँकेत कृषी अधिकारी पदांवर नोकरी कशी मिळते? आणि त्यांना पगार किती मिळतो हे आपण जाणून घेऊया..

शेती कर्ज, एटीएम कार्ड आणि इतर संबंधित सेवा यांसारख्या बँकेच्या आर्थिक उत्पादनांचा प्रचार करणे हे कृषी अधिकाऱ्याचे मुख्य काम आहे. बँकेच्या या आर्थिक उत्पादनांचा ग्रामीण भागात प्रचार करण्याचे काम कृषी क्षेत्र अधिकाऱ्यांना करावे लागते. (Bank Agriculture Officer Job)

कृषी अधिकारी होण्यासाठी आयबीपीएस परीक्षा द्यावी लागते. यासाठी तुम्ही फलोत्पादन, पशुसंवर्धन, डेअरी सायन्स किंवा कोणत्याही संबंधित विज्ञान शाखेत पदवी धारण केलेली असणे गरजेचे आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर IBPS परीक्षा द्यावी लागते. IBPS सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भरतीसाठी दरवर्षी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करते. कृषी अधिकारीही या परीक्षेद्वारे नियुक्त केले जातात.

IBPS च्या सामायिक प्रवेश परीक्षेचे दोन टप्पे आहेत. एक लेखी परीक्षा आणि दुसरी वैयक्तिक मुलाखत आहे. दोन्ही फेऱ्यांची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कृषी क्षेत्र अधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळते. IBPS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही बँकेत ग्रेड-1 अधिकारी म्हणून रुजू होऊ शकता. या पदावर काम करणारे महाव्यवस्थापकांच्या हाताखाली काम करतात. अनुभवानंतर त्याला व्यवस्थापक पदावर बढती दिली जाते.

कृषी अधिकारी पदावर काम करणाऱ्यांचा पगार तुमची पात्रता, पूर्वीचा अनुभव आणि तुम्ही ज्या बँकेत काम करत आहात त्यावर अवलंबून असते. कृषी क्षेत्र अधिकार्‍यांचा प्रारंभिक पगार दरमहा सुमारे 23,700 रुपयांपासून सुरू होतो. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि शहर भरपाई भत्ता यांसारखे इतर भत्तेही मिळतील. महाव्यवस्थापक पदासाठी प्रति वर्ष 11,40,000 रुपये पगार मिळू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular