7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

‘या’ लोकांसाठी केळी असते विष तर ‘या’ लोकांसाठी ठरते वरदान! Banana for Health

केळी हे खूप सर्वत्र उपलब्ध होणारे आणि शक्तिशाली फळ आहे. केळी खाल्ल्याने शरीरात उर्जा येते. परंतु आयुर्वेदात केळीला काही लोकांसाठी अत्यंत धोकादायक मानले आहे. चला जाणून घेऊया केळी खाण्याचे कोणते फायदे आहेत आणि कोणत्या लोकांनी त्यापासून दूर राहावे याविषयी…

Banana for Health

केळी मधून व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन बी 6 सोबतच केळ्यांमधून अँटीऑक्सिडंट्स ग्लूटाथिओन, फिनोलिक्स, डेल्फिडिनिन, रूटिन आणि नारिंगिन हि तत्वे देखील शरीराला मिळतात. न्यूट्रिशनिस्टच्या मते, केळी वात पित्त दोष संतुलित करते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की वात खराब झाल्यामुळे सुमारे 80 प्रकारचे रोग होतात. ज्यामध्ये ड्रायनेस, काटेरी वेदना, हाडांमध्ये गॅप होणे, बद्धकोष्ठता, चव , कडू लागणे इत्यादीसारख्या अनेक समस्यांचा समावेश आहे.

आयुर्वेदानुसार केळी हे थंड आणि पचायला जड आहे. केळी लुब्रिकेशनचे काम करते. ज्यांचे शरीर कोरडे असते, नेहमी थकवा येतो, नीट झोप येत नाही, नेहमी जळजळ होते, वारंवार तहान लागते, जास्त राग येतो अशा लोकांनी केळी आवर्जून खाणे गरजेचे आहे.

केळी हे कफ दोष वाढवते, म्हणून ज्यांना जास्त कफ आहे त्यांनी मात्र केळी सेवन करू नयेत. कफ वाढल्यामुळे पचन अग्नी कमजोर होतो. त्यात केळी खाल्याने आणखी भर पडते. त्यामुळे अतिरिक्त कफ, खोकला, सर्दी तसेच दम्याच्या रुग्णांनी केळी खाऊ नये, किंवा खाल्ली तरी मर्यादित प्रमाणात खावीत.

खालील लोकांनी केळीचे सेवन टाळावे

  • बद्धकोष्ठता : अनेक पोषक तत्वांनी युक्त केळीच्या अतिसेवनाने पोटात अनेक समस्या निर्माण होतात. तज्ञांच्या मते, यामुळे बहुतेक लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या होते.
  • लठ्ठपणा : असे म्हटले जाते की केळीचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो. खरे तर, त्यात असलेली नैसर्गिक साखर चरबी बनवू शकते.
  • अॅसिडिटी : सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी केळी खाण्याची चूक अनेकदा लोक करतात. यामुळे त्यांना गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
  • दातांच्या समस्या : केळीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास दात किडण्याची दाट शक्यता असते. पालक कधीही मुलाला ते खायला देतात, जे त्यांच्या दातांसाठी चांगले नसते.
  • रक्तातील साखरेची पातळी : ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी केळी खाणे टाळावे. जर त्यांनी केळी जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यामुळे त्यांची साखरेची पातळी वाढू शकते.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles