बालिंगा पूल, कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग अद्याप वाहतूकीसाठी बंद | Kolhapur Flood Update 2024
कोल्हापूर | बालिंगा ते दोनवडे दरम्यान रस्त्यावर दीड फुट पाणी वाहत असल्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी (Kolhapur Flood Update 2024) अद्याप बंद आहे, तसेच कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रजपुतवाडी केर्ली दरम्यान रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग देखील वाहतुकीसाठी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील महापूराचा जोर कमी होत असला तरी अद्याप 83 बंधारे पाण्याखाली आहेत. त्याचबरोबर प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्यमार्गांवर पाणी असल्याने ते वाहतूकीसाठी बंद आहेत.
पंचगंगेची पाणीपातळी कमी होत असली तरी पाणी कमी होण्याचा वेग संथगतीनेच आहे. सध्या पंचगंगा अद्यापही धोकापातळीच्या वरूनच वाहत असून सध्याची पाणीपातळी 46.3 फूट आहे.
दि.29/07/2024
सकाळी : 10.00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
46\’03\”
( 544.28 m )
विसर्ग 65334 Cusecs
( नदी इशारा पातळी 39\’00\” व धोका पातळी – 43\’00\”)
एकुण पाण्याखाली बंधारे – 83