News

जगातील पहिली CNG Bike भारतात लाँच होतेय; 100 रुपयात 100 किलोमीटर धावणार | Bajaj CNG Bike

आतापर्यंत तुम्ही सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी चारचाकी गाड्या उभ्या असल्याच पाहिलं असेल. पण लवकरच आता हे चित्र बदलणार आहे. सीएनजी पंपांवर मोठ्या गाड्यांसोबत CNG Bikes देखील रांगेत उभ्या असलेल्या पहायला मिळणार आहेत. कारण भारतीय वाहन उद्योगातील अग्रणी कंपनी Bajaj जगातील पहिली CNG Bike सादर करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बजाज 5 जुलैला जगातील पहिली सीएनजी बाइक (Bajaj CNG Bike) लॉन्च करणार आहे. अजूनपर्यंत या बाईकच्या नावाची पुष्टी झालेली नाही. परंतु ही बाईक (Bajaj Bruzer 125 CNG) अशा नावाने असेल अशी अपेक्षा आहे. कंपनी 100-150 सीसी सेगमेंटच्या ग्राहकांसाठी ही बाईक बाजारपेठेत आणेल. ही बाइक रनिंग कॉस्ट 50 टक्क्याने कमी करेल असा कंपनीचा दावा आहे.

म्हणजेच, जर तुमची बाइक एक लीटर फ्यूलमध्ये 50 किलोमीटरचा मायलेज देत असेल, तर 100 किलोमीटरसाठी 2 लीटर फ्यूल लागेल. 2 लीटर फ्यूलची किंमत 200 रुपये आहे. मात्र बजाजची सीएनजी बाइक रनिंग कॉस्ट 50 टक्क्याने कमी करत असेल, तर 100 किलोमीटरसाठी तुम्हाला 100 रुपयेच खर्च येईल.

बजाज सीएनजी बाईकची वैशिष्ट्ये:

  • पेट्रोलपेक्षा स्वस्त: सीएनजी बाईक चालवणे पेट्रोल बाईकपेक्षा 50-65% स्वस्त असेल.
  • कमी प्रदूषण: सीएनजीमुळे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड आणि हायड्रोकार्बन उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होईल.
  • अधिक मायलेज: सीएनजी बाईक एक किलो सीएनजीवर 100 किलोमीटर पर्यंत धावू शकते.
  • शक्तिशाली इंजिन: बजाज सीएनजी बाईकमध्ये पेट्रोल बाईकइतकेच शक्तिशाली इंजिन असेल.
Back to top button