कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. दिनांक 26 जुलै 2023 रोजी सकाळी 10.06 वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक 4 उघडले आहे. धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 3, 4, 5 & 6 अशी एकूण 4 द्वारे सकाळपासून उघडली आहेत.
विसर्ग : चार दरवाज्यातून 5712 क्यूसेक
पॅावर हाऊसमधून 1400cusec
एकूण विसर्ग : 7112 क्यूसेक सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा सकाळी 8.15 वाजता उघडला आहे. हा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 असून यातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पॉवर हाऊस मधून 1400 क्युसेक पाणी विसर्ग सुरू असल्याने एकूण 2828 क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी 8 वाजता 40’04” (542.48m) असून विसर्ग 60022 क्युसेक आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर असली तरी राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पूरपरिस्थितीचा विचार करून 2019 व 2021 च्या पूरबाधितांना स्थलांतर करण्यास सांगितले आहे.