Sunday, September 24, 2023
HomeCareerआष्टा पीपल्स बँक सांगली येथे विविध पदांची भरती | Ashta Peoples Bank...

आष्टा पीपल्स बँक सांगली येथे विविध पदांची भरती | Ashta Peoples Bank Sangli Bharti 2023

सांगली | आष्टा पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा  येथील कार्यालयांसाठी ही भरती केली जाणार आहे. ‘मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी’ अशी विविध पदे याव्दारे भरती केली जाणार आहेत. (Ashta Peoples Bank Sangli Bharti 2023)

या पदभरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज (Ashta Peoples Bank Sangli Bharti 2023) मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी apcbashta@rediffmail.com या इमेलचा वापर करावा, तर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मुख्य कार्यालय, मारुती रोड, कापड पेठ, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली ४१६३०१ आपले अर्ज या पत्त्यावर पाठवावेत.

शैक्षणिक पात्रता

मुख्य कार्यकारी अधिकारी
B.Com., M.Com. / कोणत्याही शाखेचा पदवीधर, चार्टर्ड अकौंटंट व कॉस्ट अकौंटंट, CAIIB / DBF / MBA FINANCE, ICWA यांना प्राधान्य.
अनुभव बँकिंग क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजाचा ८ वर्षांचा अनुभव असावा.

शाखाधिकारी
B.Com., M.Com./ कोणत्याही शाखेचा पदवीधर, JAIIB, |CAIIB, MBA Finance. D.B.F. इ.
अनुभव बँकेच्या अधिकारी / शाखाधिकारी कामकाजातील ५ वर्षांचा अनुभव असावा

अधिक माहितीसाठी इच्छूक उमेदवारांनी https://shorturl.at/fWX02 या लिंकवर जाऊन भरती संदर्भातील माहिती काळजीपूर्वक वाचावी. तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.ashtapeoplesbank.com ला भेट द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular