Saturday, September 23, 2023
HomeCareerआरोग्य विभाग पुणे ग्रामीण येथे 113 रिक्त जागांची भरती | Arogya Vibhag...

आरोग्य विभाग पुणे ग्रामीण येथे 113 रिक्त जागांची भरती | Arogya Vibhag Pune Bharti 2023

पुणे | जिल्ह्यातील चार ग्रामीण रुग्णालये, दाेन ट्राॅमा केअर आणि आणि एक उपजिल्हा रुग्णालय अशा सात ठिकाणी विविध संवर्गांतील 113 पदांची कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने यासाठी नाशिक येथील ‘महाराष्ट्र विकास ग्रुप’ या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. एक वर्षाच्या करार तत्त्वावर या सर्व नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यावरून आराेग्य विभागातही कंत्राटीकरणाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे.

स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, लॅब सहायक, कनिष्ठ लेखनिक, बाह्यरुग्ण लेखनिक, शस्त्रक्रिया विभाग कामगार, ब्लड बँक सहायक, अपघात विभाग सहायक, ब्लड बँक तंत्रज्ञ, डायटिशिअन, ईसीजी तंत्रज्ञ, शिपाई, वॉर्डबॉय आणि सफाई कामगार अशी विविध संवर्गांची पदे या अंतर्गत भरण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश पुणे परिमंडळचे उपसंचालक राधाकिशन पवार यांनी जारी केले आहेत. 


आरोग्य विभाग पुणे अंतर्गत ‘गट क’च्या 1489 जागांसाठी भरती; प्रारूप जाहिरात आली | Arogya Vibhag Pune Bharti 2023

पुणे |  पुणे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत लवकरच गट क च्या  विविध पदांसाठी भरती (Arogya Vibhag Pune Bharti 2023) प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पुणे परिमंडळात 1489 पदे रिक्त आहेत, त्यानुसार त्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल.

आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालीविविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील खालील विविध पदांची भरती (Arogya Vibhag Pune Bharti 2023) प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

यासाठी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून विभागातर्फे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रस्तूत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदानिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे. अर्ज करण्याची पध्दत, https://arogya.maharashtra.gov.in/https://nrhm.maharashtra.gov.in/ द्वारे राबविण्यता येऊ शकते.  तसेच  आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल लवकरच प्रकाशित केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular