मुंबई | भारतीय सैन्य अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यात (Army TGC Bharti 2023) येणार आहेत. याठिकाणी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) ऑफिसर्स एंट्री 139 या पदांच्या 30 रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
Army TGC Bharti 2023
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 27 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज बंद केल्यानंतर ऑनलाइन अर्जात सादर केलेल्या तपशिलांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. या संदर्भात कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया –
आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) 139 एंट्री 2023 साठी निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:
1. उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग
2. SSB + मुलाखत
3. दस्तऐवज पडताळणी
PDF जाहिरात – Army TGC Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Join Indian Army
अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/