मुंबई | सहकार विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी 14 व 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली.
या परीक्षेसाठी 6 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. जाहिरातीनुसार विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस. या कंपनीमार्फत सोमवार (ता. 14) व बुधवारी (ता. 16) ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://sahakarayukta. maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, वरील संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करणेची नोंद घ्यावी.
पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर! सहकार आयुक्तालय मार्फत सरळ सेवा भरती, 309 रिक्त जागा, ‘या’ लिंकवरून अर्ज करा
मुंबई | सहकार आयुक्तालया मार्फत विविध रिक्त पदांच्या भरतीची (Sahakar Ayukta Bharti 2023) घोषणा करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 309 रिक्त जागांची भरती केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांना 24 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे/ कोल्हापूर / छत्रपती संभाजी नगर / लातूर/ अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरिक्षक श्रेणी 2, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक ही 309 पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. (Sahakar Ayukta Bharti 2023)
यासाठी सहकार विभागाच्या https://sahakarayikta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 5 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वाजलेपासून दिनांक 24 जुलै 2023 रात्री 23.59 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील.
या पदभरतीसाठी वयोमर्यादा खुला प्रवर्ग – 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग – 43 वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. तसेच यासाठी परिक्षा शुल्क म्हणून अमागास – रु. 1000/- तर मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक- रु.900/- द्यावे लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
सहकारी अधिकारी श्रेणी 1- मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण.
सहकारी अधिकारी श्रेणी 2- मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण.
लेखापरिक्षक श्रेणी 2 – मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण.
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक – मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण.
उच्च श्रेणी लघुलेखक – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तसेच 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
निम्न श्रेणी लघुलेखक – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
लघुटंकलेखक – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, 80 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
PDF जाहिरात – Sahakar Ayukta Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Online Application Link
अधिकृत वेबसाईट – sahakarayukta.maharashtra.gov.in
Salary Details For Sahakar Ayukta Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहकारी अधिकारी श्रेणी 1 | S-१४ : ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
सहकारी अधिकारी श्रेणी 2 | S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
लेखापरिक्षक श्रेणी 2 | S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक | S-०८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
उच्च श्रेणी लघुलेखक | S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
निम्न श्रेणी लघुलेखक | S-१४ : ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
लघुटंकलेखक | S-०८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते |
How To Apply – Sahakar Ayukta Maharashtra Recruitment 2023
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे.
- खाते तयार केले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
- सेवा प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठीच अर्ज करणे.
- प्रस्तुत परिक्षा संवर्गनिहाय राज्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने एका संवर्गातील पदासाठी एकाच विभागात अर्ज सादर करता येईल. सबब उमेदवारांनी अर्ज सादर करताना विभागाची निवड काळजीपूर्वक करावी.
- विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
- परिक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.