अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायला Dhananjay Munde यांना अब्रू आहे? धनंजय मुंडेच्या वर्मावर कुणी बोट ठेवलं? वाचा…

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर 275 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दमानिया यांच्या मते, कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी नियमबाह्य खरेदी प्रक्रियेत अनियमितता केली. या आरोपांना धनंजय मुंडे यांनी खोडून काढत, संपूर्ण प्रक्रिया मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर आणि नियमानुसार पार पडल्याचा दावा केला आहे. तसेच अंजली दमानिया यांच्यावर फौजदारी अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दमानिया यांचे प्रत्युत्तर

धनंजय मुंडे यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना अंजली दमानिया म्हणाल्या, “अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल, तर करा. यामध्ये तुमच्यावरच कोर्ट ताशेरे ओढेल, ह्यात मला काडीमात्र शंका नाही. मी स्वतः ही केस हायकोर्टात लढेन.”

धनंजय मुंडेला स्वत:ची काय अब्रू आहे?

सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “अब्रू नुकसानीचा दावा कोण करतंय? धनंजय मुंडे! ज्यांच्यावर त्याच्या मेहुणीने बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता आणि जो त्याच्या एकमेव मुलाची आई करुणा मुंडेवर अन्याय करतो. तीला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलात पाठवतो. तो? अशा धनंजय मुंडेला स्वत:ची काय अब्रू आहे? तर त्याने इतरांवर अब्रू नुकसानी दावा दाखल करावा..”

मिडिया ट्रायल म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही.

पुण्यातील RTI कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी मंत्री Dhananjay Munde यांच्यावर टीका केली आहे. ते X वर लिहितात. “धनंजय मुंडे आपण ज्या पेशामध्ये आहात त्यात आरोप प्रत्यारोप होणारच, त्याकडे मिडिया ट्रायल म्हणून दुर्लक्ष करणे योग्य नाही. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर समर्पक उत्तरे देणे हा त्यावरील उपाय आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, केंद्र सरकारी कंपन्यांना कामे, निविदा देणे किंवा दिल्याचेभासवण्याचा तसेच डीबीटी मधून काही वस्तू वगळून त्यांची निविदा काढण्याचा खेळ महाराष्ट्रात बराच काळ सुरू आहे. या खेळात तरबेज असणारे ठेकेदार मंत्रालयात राजरोसपणे वावरताना दिसतात.”

घोटाळ्याचे मुख्य आरोप

  1. निविदा निघण्यापूर्वीच संपूर्ण रक्कम अदा.
  2. कच्चा माल खरेदीसाठी 16 मार्चला पैसे अदा, पण निविदा 30 मार्चला जाहीर.
  3. बॅटरी स्पेअरचे पैसे 28 मार्चला अदा, निविदा मात्र 5 एप्रिलला.
  4. कापूस साठवणुकीच्या बॅगचे पैसे 16 मार्चला, निविदा महिनाभरानंतर.
  5. केंद्र सरकारच्या आदेशांना न जुमानता डीबीटीऐवजी उपकरणे खरेदीसाठी निविदा प्रक्रिया.

वाल्मीक कराड भविष्यात निर्दोष सुटेल

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात एकजूट आहे. तसेच वाल्मीक कराड भविष्यात निर्दोष सुटेल अशी व्यवस्था केली जाईल.”