मुंबई | राज्यातील महिला व बालविकास विभागाकडून लवकरच 10 हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी नवीन भरती केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या उद्दिष्ट्यानुसार ही प्रक्रिया हाती घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे 10 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 16 प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची 151 तर मदतनीसची 416 पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस पदे भरतीस मान्यता दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदांची भरती 20 मार्चपूर्वी केली जाणार आहे. सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्तपदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत 5 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत.
नवीन भरती आणि पदोन्नती प्रक्रिया – Anganwadi Sevika Bharti 2025
➡️ नवीन भरतीसाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
➡️ ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या मदतनीसांना दहावी उत्तीर्ण असल्यास सेविकापदी थेट नियुक्ती.
➡️ उर्वरित रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया राबवली जाणार.
➡️ ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतीतील तर शहरी भागात संपूर्ण महापालिकेच्या क्षेत्रातील उमेदवार पात्र.
➡️ निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा नाही; उमेदवारांचे गुणांकन महत्त्वाचे.
राज्यातील महिलांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी ही महत्वाची बातमी असून, अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरूवात झाली आहे.
मानधन आणि भत्त्यासाठी 163 कोटींच्या निधीला मंजुरी
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. त्यांना डिसेंबर महिन्यातील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 163.43 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना थकबाकीचा भत्ता मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीची माहिती
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट प्रकल्पाअंतर्गत 25 सेविका व 49 मदतनीस, बार्शी प्रकल्पाअंतर्गत 23 सेविका व 24 मदतनीस, वैरागअंतर्गत 14 सेविका व 15 मदतनीस, करमाळा प्रकल्पाअंतर्गत सात सेविका व 29 मदतनीस, माढ्याअंतर्गत 14 सेविका व 10 मदतनीस, कुर्डुवाडी-टेंभुर्णी प्रकल्पाअंतर्गत दोन सेविका, सहा मदतनीस, माळशिरस प्रकल्पाअंतर्गत दोन सेविका, 105 मदतनीस, अकलूजअंतर्गत चार सेविका व 14 मदतनीस, मंगळवेढा प्रकल्पाअंतर्गत तीन सेविका, सहा मदतनीस, मोहोळअंतर्गत तीन सेविका व 15 मदतनीस, उत्तर सोलापूर प्रकल्पाअंतर्गत 14 सेविका व सात मदतनीस, पंढरपूर एक व पंढरपूर दोन प्रकल्पाअंतर्गत 22 सेविका व 82 मदतनीस, सांगोलाअंतर्गत पाच सेविका व सात मदतनीस, कोळाअंतर्गत चार सेविका व आठ मदतनीस आणि दक्षिण सोलापूर प्रकल्पाअंतर्गत नऊ सेविका व 39 मदतनीस, अशी भरती होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 4076 सेविकांची पदे मंजूर असून त्यातील 3925 पदे भरलेली आहेत. तर मदतनीस यांची चार हजार 76 पदे मंजूर असून त्यातील 416 पदे रिक्त आहेत. पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागविले जाणार आहेत. सेविकांसाठी इयत्ता बारावी उत्तीर्णची अट आहे. दरम्यान, सोलापूरसह राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यांमधील सुमारे 10 हजार पदे (सेविका व मदतनीस) 20 मार्चपूर्वी भरली जाणार आहेत.