अंबरनाथ | अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना १९६१ अंतर्गत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्यावतीने दि. २० मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय स्तरावरील प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ (अप्रेंटिस) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ITI तसेच इ. ८ वी, इ. १० वी, इ. १२ वी उत्तीर्ण किंवा उच्च स्तर आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयटीआयच्या वतीने (Ambarnath Job Fair) करण्यात आले आहे.
अंबरनाथ येथील आयटीआयमध्ये (Ambarnath Job Fair) सकाळी १०.०० ते सायं. ५:०० या वेळेत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना तसेच इ. ८ वी इ. १० वी इ. १२ वी उत्तीर्ण किंवा उच्च स्तर आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.एस. जाधव यांनी केले आहे.