8.1 C
New York
Friday, December 1, 2023

Buy now

Amazon मध्ये नोकऱ्याच नोकऱ्या; 1 लाख जागाची भरती, संधी सर्वांसाठी | Amazon Jobs

मुंबई | Amazon India ने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 1 लाख रिक्त जागा भरण्याची (Amazon Jobs) तयारी केली आहे. एका निवेदनात, Amazon India ने घोषणा केली की, त्यांनी ऑपरेशन नेटवर्कवर एक लाखाहून अधिक हंगामी नोकर्‍या निर्माण केल्या आहेत.

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या (Amazon Jobs) संपूर्ण भारतातील तरुणांना मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, चेन्नई तसेच इतर महत्वाच्या शहरांमध्ये दिल्या जातील. 8 ऑक्टोबर 2023 पासून अ‍ॅमेझॉन ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेल सुरू होत आहे, त्यामुळे अ‍ॅमेझॉन इंडियाने अनेक नवीन कर्मचाऱ्यांना आपल्या नेटवर्कमध्ये सामील केले आहे. नवीन अपॉइंटमेंट्समध्ये कस्टमर सर्व्हिस मॉडेल सामील आहे, ज्यापैकी काही व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस मॉडेलचा भाग आहेत. देशभरात आपले नाव मोठे करणे आणि ग्राहकांना चांगला अनुभव देणे, हा यामागचा अ‍ॅमेझॉनचा उद्देश आहे.

नोकरीसाठीAmazon Indiaया शब्दावर क्लिक करा आणि अर्ज करा

अ‍ॅमेझॉन ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना म्हणाले की, अ‍ॅमेझॉनसाठी सणासुदीचा हंगाम नेहमीच खास असतो. नीलसन मीडियाने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, 75% ग्राहकांची ऑनलाइन खरेदीला पहिली पसंती असते. त्यामुळेच ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही नवीन भरती करत आहोत. ते पुढे म्हणाले की, Amazon India ने एक मजबूत डिलिव्हरी नेटवर्क तयार केले आहे आणि 15 राज्यांमध्ये प्रमुख केंद्रे स्थापन केली आहेत.

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles