Ajit Pawar : विशाळगड हिंसाचार पिडीतांना अजित पवारांचा शब्द, म्हणाले…
कोल्हापूर | अजित पवार यांनी आज (गुरूवार 18 जुलै) विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात आणि विशाळगडावरील अतिक्रमण झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच ज्या अतिक्रमणावर प्रशासना कडून कारवाई करण्यात आली आहे त्याचीदेखील पाहणी केली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी, कोणाच्याही घरावर कारवाई होणार नाही, असं सांगत ग्रामस्थांना आश्वस्त केलं. विशाळगडावर (Vishalgad) उसळलेल्या दंगलीप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, कोणीही कायदा व नियम हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत अजित पवारांनी दंगलखोरांना इशारा दिला.
दरम्यान, अजित पवार यांनी वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांना तंबी दिली. ते म्हणाले, कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका. कोणी तसा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. गड-किल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे, सरकार त्यास अनुकूल आहे.” असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
अजित पवार म्हणाले, “निष्पाप लोकांच्या घरांचं नुकसान झालं आहे. इथे राहणाऱ्या लोकांचा आणि अतिक्रमणाचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे नुकसानग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केलेली आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.”