Tuesday, September 26, 2023
HomeNewsआताची सर्वात मोठी बातमी | अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?...

आताची सर्वात मोठी बातमी | अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप..! Ajit Pawar

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात पुन्हा एकदा बंड केले आहे. अजित पवार 25 आमदारांसोबत भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत बसणार असल्याचे समजते. मागील काही दिवसांपासून अजित पवार पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.

आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर अजित पवार (Ajit Pawar) समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार असल्याचे जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप घडल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

– अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह 25 आमदार फुटले.
– भाजप शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा
– अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
– प्रफुल्ल पटेल राजभवनावर दाखल
– राष्ट्रवादीचे आमदार राजभवनावर दाखल
– आजच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्याची यादी

अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
अनिल भाईदास पाटील
आदिती तटकरे
संजय बनसोडे
बाबूराव अत्राम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको, संघटनात्मक जबाबदारी हवी असे म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात जोराची चर्चा सुरू झाली होती.

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. 6 जुलैला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची याबाबत बैठक होणार आहे, या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र अशातच आता अजित पवार सत्तेत सहभागी होणार असल्याचे बोलले जात असल्याने येत्या काळात आणखी कोणकोणत्या घडामोडी घडतात हे पहावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular