अहमदनगर | राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाड्यांमधील पदभरतीला सुरूवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्या अंतर्गत देखील अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी इच्छूक आणि पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Anganwadi Bharti 2023)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, बेलवंडी २ ता. श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, अंतर्गत खालील महसुली गावामध्ये “अंगणवाडी मदतनीस ” मानधनी पदावर भरतीसाठी पात्र व इच्छुक आणि स्थानिक महिलांचे अर्ज मागविणे येत आहेत. (Anganwadi Bharti 2023)
अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १९/०६/२०२३ ते दिनांक ०३/०७/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) अशी राहील. सदर भरतीची विस्तृत जाहिरात, अटी व शर्ती तसेच अर्ज नमुना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात व तसेच अंगणवाडी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही महिला बाल विकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०२३ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीचे तंतोतंत पालन करुन करण्यात येईल. (Anganwadi Bharti 2023)

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, श्रीगोंदा, पंचायत समिती श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर, अंतर्गत खालील महसुली गावांमध्ये ‘अंगणवाडी मदतनीस’ मानधनी पदावर भरतीसाठी पात्र व इच्छुक आणि स्थानिक महिलांचे अर्ज मागविणेत येत आहेत.
अर्ज स्विकारण्याचा कालावधी दिनांक १२/०६/२०२३ ते दिनांक २३/०६/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) अशी राहील. सदर भरतीची विस्तृत जाहिरात, अटी व शर्ती तसेच अर्ज नमुना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात व तसेच अंगणवाडी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया ही महिला बाल विकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०२३ च्या शासन निर्णयातील कार्यपध्दतीचे तंतोतंत पालन करुन करण्यात येईल.

वरील दोन्ही ठिकाणच्या अंगणवाडी मदतनीस पदभरतीच्या अधिक तपशिलासाठी
PDF जाहिरात 1 – https://Anganwadi Helpers/pdf1
PDF जाहिरात 2 – https://Anganwadi Helpers/pdf2
काळजीपूर्वक वाचावी.