अंतिम तारीख – कृषी विभागात पर्यवेक्षक पदांसाठी भरती; 759 पदे | ऑनलाईन अर्ज सुरु | Agriculture Department Job

मुंबई | कृषी विभाग हा सर्वच दृष्टीने महत्त्वाचा विभाग आहे. ग्रामीण भागातील उमेदवार महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 (Agriculture Department Job) ची आतुरतेने वाट पाहत असतात. आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार कृषी विभागात 759 पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सर्व जिल्ह्यांचे अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. इच्छुक अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2023 आहे.

या पदासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहाय्यक, गट-क या पदावर दिनांक ०१ जानेवारी, २०२३ रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र असतील.

  • पदाचे नाव – कृषि पर्यवेक्षक
  • पदसंख्या – ७५९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क – रु. 650/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
  • कृषि विभाग नागपूर भरती 2023 – 113 पदे 
  • कृषी विभाग पुणे भरती 2023 – 112 पदे 
  • कृषी विभाग नाशिक भरती 2023 – 96 पदे 
  • कृषी विभाग, औरंगाबाद भरती 2023 – 69 पदे 
  • कृषी विभाग अमरावती भरती 2023 – 109 पदे 
  • कृषी विभाग, ठाणे भरती 2023 – 79 पदे 
  • कृषी विभाग, कोल्हापूर भरती 2023 – 82 पदे 
  • कृषी विभाग, लातूर भरती 2023 – 99 पदे 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कृषि पर्यवेक्षक1. महाराष्ट्र शासनाच्या कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषि सहायक (गट-क) या पदावर दिनांक १ जानेवारी, २०२३ रोजी किमान ५ वर्षाहुन कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेल्या व्यक्ती.स्पष्टीकरण:- ५ वर्षांची नियमित सेवेची गणना करताना खालील बाबी गृहीत धरण्यात येतील :I. नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, कृषि सेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी पुर्ण केल्यापासून,II. पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून.2. कृषि सहायक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती,3. शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणा-या व्यक्ती; आणि4. एतदर्थ मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे वा सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  •  उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल.
  • अर्ज 14 जानेवारी 2023 पासून सुरु होतील.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2023 आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.