News
मंदिर विहिरीत कोसळून गडमुडशिंगी येथे एकाचा मृत्यू
कोल्हापूर | गडमुडशिंगी येथील विहिरीच्या काठावरील मंदिर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत कृष्णात उमराव दांगट यांचा मृत्यु झाला आहे. ते मंदिरात पूजा करीत असताना मंदिर पाण्यात कोसळल्याचे दुर्घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गडमुडशिंगी येथे विहिरीच्या काठावर हे छोटे नृसिंह मंदिर होते. याच बांधकाम 20 ते 22 वर्षांपूर्वीच असल्याची माहिती आहे. येथील दांगट परिवाराचे कुलदैवत असल्यामुळे दांगट कुटुंबिय या मंदिरात नित्यनियमाने पूजा करतात. आज अशीच नित्यपूजा सुरू असताना मंदिर विहीरीच्या पाण्यात कोसळल्याने कृष्णात दांगट यांचा मृत्यु झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच कृष्णात यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू पथक व जीवरक्षक दिनकर कांबळे घटनास्थळी दाखल झाले आहेत.