यवतमाळ : 10वी ते पदवीधरांसाठी नोकरीची संधी; 393 रिक्त जागांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन | Yavtmal Job Fair 2024
यवतमाळ | जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची (Yavtmal Job Fair 2024) चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी शासनाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा 02 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून विक्री प्रतिनिधी, मशीन ऑपरेटर, वेल्डर, मानव संसाधन सहाय्यक, विपणन कार्यकारी, अभियंता, विद्युत अभियंता, पिकर पेकर, फिटर अशा विविध 200 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे व संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे.
शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, Graduate, Diploma (Read Pdf)
मेळाव्याचा पत्ता – श्री. संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव ता.शेगाव जि.बुलढाणा.
PDF जाहिरात – Yavtmal Job Fair 2024
नोंदणी करा – rojgar.mahaswayam.gov.in