घर बसल्या करा ‘हे’ 3 वर्क फ्रॉम होम जॉब.. होईल तगडी कमाई..! Work From Home

0
152

मुंबई | कोविड-19 मुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कार्यशैलीत बदल करत कर्मचाऱ्यांना घरातूनच काम (Work From Home) करण्याची परवानगी दिली. अर्थात सर्वच क्षेत्रात हे शक्य नसले तरी बहुतांशी कंपन्यानी ही पध्दत स्विकारलेली पहायला मिळाले. त्यामुळे वर्क फ्रॉम होमचे परदेशातील मॉडेल भारतातही रुजू झाले.

आयटी क्षेत्रासह अनेक कंपन्यांनी त्याचा लागलीच स्वीकार केला. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी हायब्रिड मॉडेल निवडले. त्यानुसार, आठवड्यातील दोन दिवस कार्यालयात तर उर्वरीत तीन दिवस घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली. अनेकांना कामाची ही पध्दत देखील आवडत असल्याने अनेकजण अशा प्रकारचे जॉब निवडून चांगली आर्थिक कमाई करीत आहे. अशाच काही घरबसल्या करता येणाऱ्या कामांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया…

फ्रीलान्स रायटिंगमध्ये करिअर

जर तुमच्याकडे चांगले लिखाणाचे कौशल्य असेल तर घरातूनच तुम्ही फ्रीलान्स रायटिंगच्या माध्यमातून काम सुरु करु शकता. त्यासाठी अनेक मीडिया हाऊस, इतर कंपन्या संधी देतात. यासंबंधीचे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. अपवर्क, फिवरर याठिकाणी तुमचे खाते उघडता येते.

यामध्ये तुम्हाला भारतासह परदेशातील लिखाणाचे काम तुम्हाला मिळू शकते. परदेशातील काम मिळाले तर तुम्हाला PayPal खाते उघडावे लागेल. या खात्यात तुम्हाला परदेशातून कामाचे पैसे घेता येतात. या कामातून महिन्याला 40-50 हजार रुपये कमाई करता येते.

डाटा एनालिसीस

सध्याच्या घडीला डाटा एनालिसीसची मोठी मागणी आहे. तुम्हाला जर हे काम येत असेल तर अशा अनेक कंपन्यात तुम्ही जॉबसाठी अर्ज करु शकता. इतकेच नाही तर इतर पण अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले होतील. डाटा एनालिसीससाठी ऑनलाईन कोर्स पण उपलब्ध आहे. काही कंपन्या कोर्स पूर्ण झाल्यावर ऑनलाईन काम पण उपलब्ध करुन देतात. तुम्हाला प्रमाणपत्रासोबतच जॉब पण ऑफर होतात.

सुरुवातीला इनटर्नशीप अथवा ट्रेनी म्हणून काम केल्यास अनुभवानंतर पॅकेज वाढते. हे काम करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन, एक लॅपटॉप, संगणकाची आवश्यकता आहे. या क्षेत्रात वर्क फ्रॉम होमचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 200 रुपये ते 1,500 रुपये प्रति तास असे कामाचे पैसे तुम्हाला यातून मिळतात.

अनुवादक/ट्रान्सलेटर

जर तुम्हाला एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान असेल तर तुम्ही अनुवादक अर्थात ट्रान्सलेटरचे काम करू शकता. हे काम तुम्हाला घरबसल्या करता येते. इंग्रजीवर चांगली पकड असेल, हिंदी पण चांगली असेल तर तुम्हाला घरबसल्या चांगली आर्थिक कमाई करता येते. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यासाठी उपलब्ध आहेत. अनेक प्लॅटफॉर्म योग्य उमेदवाराला प्रतिशब्द 1 ते 2 रुपये ते त्यापेक्षा अधिक मानधन देतात. त्यामुळे महिन्याला सहज 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा चांगली कमाई होते.