RBI च्या कारवाईने Paytm ग्राहकांची चिंता वाढली; ‘पेटीएम’ बंद झाल्यानंतर अकाऊंटमधील पैशांचं काय? RBI Banned Paytm
मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) बँकेविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएममध्ये पैसे भरणे आणि काढणे यासह सर्व व्यवराहांवर बंदी (RBI banned Paytm) घातली आहे.आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्सची मात्र चिंता वाढली आहे.
आरबीआयने परिपत्रक काढत या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बँकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली केली असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटलं आहे. केंद्रीय बँकेने मार्च 2022 मध्ये PPBL ला नवे ग्राहक जोडू नये असं सांगितलं होतं. पण तापासात पेटीएमने याचं पालन केलं नसल्याचं समोर आलं. यानंतर आरबीआयने PPBL वर निर्बंध लावले आहेत.
भांडवली बाजारात आयपीओ आणल्यापासून पेटीएमच्या अडचणी वाढल्या आहेत. आता पुन्हा रिझर्व्ह बँकेने पेटीएमच्या अडचणीत आणखीणच वाढ केली आहे. पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास रिझर्व्ह बँकेने मनाई केली आहे. याबाबत आदेशाची अंमलबजावणी तात्काळ होणार आहे. पेटीएमला याआधी देखील मोठा दंड ठोठावण्यात आला होता. पेमेंट आणि सेटलमेंटच्या कलम 26 (2) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी पेटीएमला रिझर्व्ह बँकेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
- आरबीआयने ग्राहक कोणत्या अडचणीविना पेटीएम बँकेतून पैसे काढू शकतात.
- पेटीएममधून फास्टटॅग रिचार्ज करता येणार नाही.
- पेटीएम बँकेत एखादं ईएमआय किंवा स्टेटमेंड पेंडिंग असेल तर तुम्ही ते लवकर क्लिअर करुन घ्या.
- पेटीएम बँक खात्यात तुम्ही कोणताही व्यवहार करु शकणार नाही.
- तुम्ही टॉप अप करु शकत नाही, ना तुम्ही गिफ्ट कार्ड पाठवू शकता. पेटीएम वॉलेट रिचार्जही करता येणार नाही.
- युपीआय पेमेंटसाठी याचा वापर करु शकता. पण यासाठी तुमचं खातं पेटीएम बँक नव्हे तर दुसऱ्या बँकेत असलं पाहिजे.
29 फेब्रुवारीपर्यंत संधी
पेटीएम ग्राहक अकाऊंट, वॉलेट, प्रीपेड इंस्ट्रूमेंट्स, फास्टटॅग, NCMC कार्डमध्ये ना पैसे डिपॉझिट होतील, ना क्रेडिट व्यवहार होईल. पण ग्राहक त्यांच्या खात्यात असणारा बॅलेन्स संपेपर्यंत सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात. 29 फेब्रुवारी 2024 नंतर, पेटीएम वापरकर्त्यांना UPI आणि BBPOU (भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट) सारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा मिळणार नाहीत. मध्यवर्ती बँकेने PPBL ला 15 मार्च 2024 पर्यंत वेळ दिला आहे. या कालावधीत, सर्व प्रलंबित व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील.