ठाणे पोलीस दलात विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Thane Police Bharti 2023
ठाणे | ठाणे पोलिस विभाग अंतर्गत विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Thane Police Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार वरील रिक्त पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. 4600601
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी गट अ | मासिक वेतन रूपये 30,000/- + दुरध्वनी व प्रवासखर्चासाठी रूपये 5,000/- एकूण मासिक देय रक्कम रूपये 35,000/- |
विधी अधिकारी गट ब | मासिक वेतन रूपये 25,000/- + दुरध्वनी व प्रवासखर्चासाठी रूपये 3,000/- एकूण मासिक देय रक्कम रूपये 28,000/- |
विधी अधिकारी | मासिक वेतन रूपये 20,000/- + दुरध्वनी व प्रवासखर्चासाठी रूपये 3,000/- एकूण मासिक देय रक्कम रूपये 23,000/- |
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात – Thane Police Recruitment 2023
अधिकृत वेबसाईट – https://www.thanepolice.gov.in/