Career

टाटांच्या iPhone निर्मिती कंपनीत 28 हजार लोकांना मिळणार नोकरी, हाती येणार इंडिया मेड आयफोन | Tata iPhone Jobs

मुंबई | TATA iPhone : देशातील आघाडीची कंपनी टाटाने अलीकडेच ‘मेक इन इंडिया’ आयफोन बनवण्यासाठी अॅपलसोबत मोठा करार केला आहे. चीनला हा मोठा धक्का मानला जात आहे. (Tata iPhone Jobs)

चीनऐवजी टाटाच्या माध्यमातून भारतात तयार झालेले आयफोन आपल्याला मिळणार आहेत. कंपनीला भारतात आयफोन निर्मितीचा वेग दुप्पट करायचा असून यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती (Jobs) करणार आहे. आपल्या कामाचा वेगाने विस्तार करण्यासाठी टाटा समूहाची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी $125 मिलियनमध्ये खरेदी केली आहे.

विस्तार योजनेअंतर्गत टाटा होसूर आयफोन युनिटमध्ये सुमारे 28000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. या युनिटचा विस्तार करण्यासाठी त्याची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. या युनिटमध्ये एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 1 ते 1.5 वर्षात कंपनी 25 ते 28 हजार लोकांना कामावर ठेवणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी सध्याच्या क्षमतेच्या 1.5 ते 2 पटीने युनिटचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. विस्ट्रॉन 2008 मध्ये भारतात आली असून, कंपनीने 2017 मध्ये Apple साठी आयफोन तयार करण्यास सुरुवात केली. या प्लांटमध्येच आयफोन 14 मॉडेलची निर्मिती करण्यात आली होती.

या प्लांटमध्ये 10,000 हून अधिक कामगार काम करतात, आता टाटा कंपनीने हा प्लांट खरेदी केला आहे. टाटांना उत्पादनक्षमता वाढवायची असल्याने या ठिकाणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे.

Back to top button