सातारा येथे 288 रिक्त पदांकरिता महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा | Satara Rojgar Melava 2024
सातारा | सातारा येथे बेरोजगार महिला उमेदवारांसाठी नोकरीची (Satara Rojgar Melava 2024) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी 288 रिक्त जागांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑफलाईन मेळाव्याची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण करियर सल्लागार, ITI प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, लाइफ पोर्टफोलिओ व्यवस्थापक, प्रशिक्षणार्थी अभियंता, एचआर / प्रशासक, विद्युत अभियंता, क्षेत्र अधिकारी, प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. हा मेळावा पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून घेतला जात आहे.
Satara Rojgar Melava 2024
शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, SSC, Diploma in Engineering, Graduate (Read Complete Details)
मेळाव्याचा पत्ता – सातारा स्कील सेंटर, रजत सागर कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, पोवई नाका, सातारा.
जाहिरात – Satara Rojgar Melava 2024
नोंदणी करा – https://rojgar.mahaswayam.gov.in