Career

शेवटची संधी: 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ पदाच्या 5696 जागांची भरती | Recruitment of Assistant Loco Pilot 2024

मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण भारतीय रेल्वेने तब्बल 5696 रिक्त जागांसाठी भरतीची (Recruitment of Assistant Loco Pilot 2024) घोषणा केली आहे. याबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार असिस्टंट लोको पायलट या पदांसाठी ही मेगाभरती केली जाणार आहे.

भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदांच्या एकूण 5696 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.

Recruitment of Assistant Loco Pilot 2024

असिस्टंट लोको पायलट पदासाठी उमेदवारांचे शिक्षण 10वी/SSLC plus ITI झालेले असणे आवश्यक आहे. तसेच या पदांसाठी 18 ते 30 ही उमेदवारांसाठी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. राखीव वर्गांसाठी वयाची सवलत दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना महिना 19,900/- इतके वेतन दिले जाईल.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करने अनिवार्य आहे. अर्ज 20 जानेवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातRRB ALP Bharti 2024
ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 20 जानेवारी 2024 पासून सुरु होतील) Apply For RRB ALP Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://indianrailways.gov.in/

Back to top button